Latest News

6/recent/ticker-posts

सिंदाळा(लो) येथील शुभांगी अजगरेचे उज्वल यश

सिंदाळा(लो) येथील शुभांगी अजगरेचे उज्वल यश


बालाजी उबाळे

औसा: तालुक्यातील शिंदाळा लो येथील शुभांगी शेषेराव अजगरे या विद्यार्थिनीने नागपूर येथील जी एच रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग शाखेत विशेष प्राविण्य सह प्रथम क्रमांक क्रमांक मिळवून उज्ज्वल यश संपादन केले आहे. स्वयंसेवी संस्थेचे कार्य करणारे शेषेराव अजगरे यांची ती कन्या असून या विद्यार्थिनीने अथक परिश्रम व महाविद्यालयातील प्राचार्य प्राध्यापकांचे मार्गदर्शन घेऊन शुभांगी उज्वल यश मिळवले आहे. पुणे येथील नामांकित कंपनीमध्ये या विद्यार्थिनीची नोकरीसाठी निवडही झाली आहे. या उज्वल यशाबद्दल रायसोनी ग्रुप ऑफ इंस्टिट्यूशन्स चे चेअरमन सुनील रायसोनी संचालक सचिन उंटवाले उपसंचालक मिलिंद खानापूरकर प्रमोद वाळके अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शिंदाळा लो येथील सरपंच सौ बबिता बाबासाहेब घोडके व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी शुभांगी अजगरेचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments