निटूर येथे कायदेविषयक शिबिर उत्साहात
निटूर:( रमेश लांबोटे ) येथे 75 वा अमृत महोत्सव दिवस साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून के एस सूर्यवंशी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर व वकील मंडळाचे माजी अध्यक्ष अॅड. तिरुपती शिंदे, अॅड. मालपुरे, अॅड. कांबळे व सुरेंद्र धुमाळ(सं.गो.यो.सदस्य,निलंगा) तसेच निटूर सोसायटीचे व्हाईस चेअरमन दिनकर निटूरे सामाजिक कार्यकर्ते रमेश लांबोटे व शिरूर आनंतपाळ स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुडके व निटूर पोलीस चौकीचे ठाणे अंमलदार सत्यवान कांबळे, पोलीस कर्मचारी गिरगुणे, पत्रकार राजकुमार सोनी या कार्यक्रमाचे अध्यक्ष गावचे सरपंच परमेश्वर हासबे, उपसरपंच संमेश्वर करंजे, ग्रामसेवक मिरकले, मंडळाधिकारी देशमुख व पत्रकार नामदेव तेलंगे, प्रशांत साळुंखे व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळेस कार्यक्रमाचे प्रस्ताविक ता वकील मंडळाचे माजी अध्यक्ष अॅड. तिरुपती शिंदे यांनी केले तर के एस सूर्यवंशी दिवानी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांनी कायदेविषयक सर्व ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. आभार सरपंच परमेश्वर हासबे यांनी मानले.
0 Comments