महाराष्ट्र महाविद्यालय येथे मानसिक स्वस्थ्य दिवस निमित्ताने कायदे विषयक शिबिर
निलंगा:(रमेश लांबोटे) तालुका विधी सेवा समिती निलंगा व विधिज्ञ मंडळ निलंगा व महाराष्ट्र विद्यालय निलंगा यांच्या संयुक्त विद्यमानाने मानसिक स्वस्थ्य दिवस निमित्ताने कायदे विषयक शिबिर महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा येथे आयोजित करण्यात आले होते सादर कार्यक्रमास महाराष्ट्र महाविद्यालयाचे प्राचार्य कोलपुके अध्यक्ष स्थानी होते सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉ. हंसराज भोसले यांनी केले तर सदर कार्यक्रमास मा.दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्रीमती शेख मॅडम व मा.दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर कुलकर्णी व तसेच निलंगा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर टाक तसेच निलंगा विधिज्ञ मंडळाचे सहसचिव अॅड डी बी सोळुंके, निलंगा विधिज्ञ मंडळाचे माजी अध्यक्ष अॅड तिरुपती शिंदे यांनी मानसिक स्वास्थ याबाबत विविध विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक अर्जुन जाधव यांनी केले सदर कार्यक्रमास प्राध्यापक व विद्यार्थी हजर होते सदर कार्यक्रमास ऑनलाइन प्रणालीद्वारे बरेच विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला.
0 Comments