भादा ग्रामपंचायतीने टाकली कात, रंगरंगोटीने आले नवे रूप
शेख बी जी.
औसा: दि.१० - औसा तालुक्यातील भादा ही ग्रामपंचायत तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायती पैकी एक ग्रामपंचायत मागील अनेक दिवसापासून रंगरंगोटी न झाल्याने जुनाट दिसत होती. मागील काही दिवसांपासून या ठिकाणी रंगरंगोटी व इतर कामे होत असल्याने नवीन रूप आले आहे. नवीन झालेल्या महिला सरपंच मीना दरेकर यांच्या प्रयत्नांने ही कामे होत असल्याने त्यांचे कौतुक केले जात आहे. तसेच या ठिकाणी ग्राम विकास अधिकारी माणिक सूर्यवंशी हे देखील या कामासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसते. ही सर्व कमी होत असली तरीही ग्रामपंचायत साठी बांधण्यात आलेल्या शौचालयाला जाण्यासाठी रस्ता नाही. फक्त बिल काढण्यासाठी हे शौचालय बांधल्याची चर्चा गावात आहे. या शौचालयाचा कसलाही वापर ग्रामपंचायत कर्मचारी, नेते मंडळी करत नाहीत कारण हे शौचालय ग्रामपंचायत कार्यालयाच्या छतावर बांधले गेले आहे व या ठिकाणी जाण्यासाठी रस्ताच नाही. यासंबंधी ग्राम विकास अधिकारी यांनी इशारा प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की या शौचालयास जाण्यासाठी लवकरच एक लोखंडी शिडी बनवणार आहोत त्यानंतर शौचालयाचा वापर होईल.
0 Comments