Latest News

6/recent/ticker-posts

वाढदिवासानिमित प्रियंका लद्देनी घेतले रमा गायकवडला शैक्षणिक दत्तक

वाढदिवासानिमित प्रियंका लद्देनी घेतले रमा गायकवडला शैक्षणिक दत्तक

 


बि डी उबाळे

औसा: तालुक्यातील भादा येथील रमा गायकवाडला सामाजिक कार्यकर्त्या तथा राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष प्रियंका लद्दे यांनी स्वतःच्या दि 12 ऑक्टोबर 2021 रोजीच्या वाढदिवसानिमित्त होतकरू मुलीस शैक्षणिक दत्तक घेतले आहे. शनिवार दिनांक 9 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी ग्रामपंचायत भादा येथे सामाजिक कार्यकर्त्या तथा राष्ट्रवादी युवती कार्यकर्त्या प्रियंका लद्दे यांनी भादा जिल्हा परिषद प्रशाला भादा येथील शिवलिंग नागापुरे यांच्या माध्यमातून सदरील रमा ज्ञानोबा गायकवाड या मुलीची आई कॅन्सर मुळे मृत्यू पावली आहे. तर वडीलही हृदयविकारामुळे काम करू शकत नाहीत ते सतत आजारी असतात. यामुळे घरची परिस्थिती एकदम हालाखीची आहे, पण मुलीमध्ये शिक्षण शिकण्याची जिद्द पाहुन. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी आपल्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस युवती जिल्हाध्यक्ष प्रियंका लद्दे यांनी ती मुलगी शिक्षण घेईपर्यंत या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. ही मुलगी मोठी होऊन खूप मोठ्या पदावर बसावी ही इच्छा प्रियंका लद्दे यांनी वर्तविली आहे. तर आज रोजी त्या मुलीस शालेय साहित्य भेट देऊन शैक्षणिक बाबतीत कोणतीही अडचण आली तर स्वतः त्यांच्या पालकांनी संपर्क साधावा असे आवाहन करून त्यांनी आपला भ्रमणध्वनी क्रमांक देऊन शैक्षणिकसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे यावेळी आश्वासन दिले. तर यापूर्वीही प्रियंका लद्दे यांनी जी प प्रशाला भादा शाळेमध्ये अलमला येथील शहीद जवान चिंते यांच्या स्मरणार्थ शाळेत शालेय साहित्य वाटप केले होते आणि नागरसोगा येथीलही मुल दत्तक घेतल्याचे समजते.

Post a Comment

0 Comments