तीन ठिकाणीअवैध दारु विक्री वर छापे तर दारु पिऊन झिंगाट असलेल्या एका ईसमावर गून्हा दाखल
शेख बी जी
औसा: दि.१० - भादा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी दि.९ व १० ला छापे टाकून अवैध दारू जप्त केली. तर एका इसमावर दारू पिऊन सामान्य जनतेला त्रास देत असल्याचे दिसून आल्याने त्याच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. तावशी ताड येथील आरोपी शाम बापूराव कांबळे यांच्या कडून मुद्देमाल-देशी दारू, किं.रु.2,660/- जप्त केले. यानंतर शिवली येथील आरोपी-अशोक संभाजीराव काकडे, याच्याकडे मुद्देमाल देशी दारूच्या 35 बाटल्या व मो. सा. एकुन किंमत रु.26,225/ जास्त केले. यानंतर सर्वात महत्वाची कामगिरी भादा येथील आरोपी -खंडू धोंडीराम माने, धोंडीराम तुकाराम माने यांच्या कडून मुद्देमाल-गावठी दारू 30 लीटर,व देशी दारु बाटल्या असा एकूण रु.1,740/- चा माल जप्त करण्यात आला. बेलकुंड येथे सार्वजनिक ठिकाणी दारु पिऊन झिंगणाऱ्या एका ईसमlवर दारुबंदी अधिनियम कलम 85 नुसार गुन्हा दाखल करून त्याची नशा उतरवली आहे. वर प्रमाणे काल व आज पो स्टे हद्दीत छापे मारण्यात आले आहेत. यापुढे प्रत्यक्ष दारु विक्रेते, जागा मालक, तसेच दारु पिऊन सार्वजनिक ठिकाणी झिंगाट असणारे लोकांना पोलिसी खाक्या दाखवला जाईल व कायदेशिर कार्यवाही करण्यात येणार आहे, त्यामुळे दारु पिणारे व्यक्तींनीही दारू सोडावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे. ही धाडसी कार्यवाही करण्यासाठी पोलीस अधिक्षक व अपर पोलीस अधिक्षक, व डी वाय एस पी यांचे मार्गदर्शनाखाली ,ए पी आय विलास नवले, पी एस आय प्रकाश शिंदे, हेड कॉन्स्टेबल बंडू डोलारे, कलमे, क्षीरसागर भगवान ,महेश चव्हाण, विठ्ठल दिंडे यांनी केली आहे.
0 Comments