मदनसुरीत मुसळधार पावसामुळे कोकळगाव मदनसुरी ओढ्याततील पुरात दोन तरुण वाहून जाताना सुदैवाने बचावले
मदनसुरी:(प्रतिनिधी/द्रोणाचार्य कोळी) रविवार दि.10 ऑक्टोबर रोजी निलंगा तालुक्यातील मदनसुरी सह परिसरात परतीचा मुसळधार पाऊस पडल्यामुळे कोकळगाव मदनसुरी रस्त्यावरील मदनसुरी ओढ्याला पूर आल्यामुळे मदनसुरी येथील सकाळी शेतात गेलेले शेतकरी सायं. पाच वाजता परत घराकडे येत असताना, पाण्याचा अंदाज न लागल्याने,शैलेश गुलाब माने वय वर्षे 25, व संजय वसंत माने वय वर्ष 40 हे दोघे हातात हात धरून साखळी पद्धत्तीने येत असता वाहून गेले. दोघांनाही पोहता येत असल्याने ते काही अंतरावर सुदैवाने बचावले, ओढ्यावरील पुलाचे पूर्णपणे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिसरातील शेता शेतात पाणी साचल्याने उरले-सुरले काढणीस आलेले सोयाबीन काढताना वरून राजाशी शेतकऱ्यांना मोठी कसरतच करावी लागते आहे.
0 Comments