शिवसेनेच्या वतीन उजेड(हीसामाबाद) येथे आरोग्य शिबिर संपन्न
निटूर: लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन पुर परिस्थिती निर्माण झाली यात शेतकऱ्यांच फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पूर परिस्थिती मध्ये अनेक नेत्यांनी दौरे केले असून आता शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आर्थिक अडचणीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, त्याच अनुषगाने पूर ग्रस्त भागात शिवसेनेकडून आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने, निलंगा तालुका प्रमुख अविनाश रेशमे, शिरुर आनंतपाळ तालुका प्रमुख भागवत वंगे, विष्णुपंत साठे, शोभा ताई बेंजरगे तसेच सामाजिक कार्यकर्ते रमेश लांबोटे व आरोग्य विभागातील डॉक्टरांची टीम उपस्थित होती.
0 Comments