Latest News

6/recent/ticker-posts

निलंग्यात शिवरत्न वीर जिवाजी महाले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

निलंग्यात शिवरत्न वीर जिवाजी महाले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी


निलंगा:(विशेष प्रतिनिधी/इरफान शेख) निलंगा येथे 09 ऑक्टोंबर रोजी जिजाऊ श्रुष्टी विद्यानगर निलंगा येते शिवरत्न जिवाजी महाले विचार मंच निलंगा यांच्या वतीने आयोजित प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शिवरत्न वीर जिवाजी महाले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवरत्न वीर जिवाजी महाले जन्मोत्सव निमित्त प्रा.डॉ. गणेशजी बेळंबे यांचे जाहीर व्याख्यान संपन्न झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी निलंग्याचे तहसीलदार गणेश जाधव होते. तर प्रमुख पाहुणे निलंगा नगरीचे नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, पंडितराव धुमाळ, विजयकुमार पाटील, गोविंद आण्णा शिंगाडे ,विनोदआप्पा आर्य, भाऊसाहेब शेंद्रे, इस्माईलसाब लदाफ, शरदभाऊ पेठकर, अजित दादा निंबाळकर, डाॅ.संजीव जगदाळे, विलास सुर्यवंशी, हरीभाऊ सगरे, मोहन क्षिरसागर यांची उपस्थिती होती. कोरोना योध्दा, नाभिक समाजातील विविध क्षेत्रातील समाज भूषण पुरस्कार संपन्न झाले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.भागवत सोमवंशी, बबन नाईकवाडे, सतीश सूर्यवंशी, ऋषी सुर्यवंशी, लक्ष्मण यादव ,दत्ता मिरकले, विष्णू माने, रवि सूर्यवंशी, राजू सोमवंशी, अनंत गायकवाड, योगेश सोमवंशी, विठ्ठल गायकवाड, कृष्णा मुळे, रमेश धोंगडे, सुनील सूर्यवंशी, आकाश सूर्यवंशी, अमोल सूर्यवंशी, शिवरत्न जिवाजी महाले प्रतिष्ठान अध्यक्ष अमोल चौधरी आदी जणांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments