Latest News

6/recent/ticker-posts

भादा सोसायटीकडून शेतकऱ्याना आवाहन

भादा सोसायटीकडून शेतकऱ्याना आवाहन 


बी डी उबाळे

औसा: तालुक्यातील भादा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित भादा यांच्याकडून विनम्र सूचना करण्यात येत असून सध्या नागरिकांना आणि शेतकऱ्यांना महागाईच्या संकटाने मारले असून केंद्राचे धोरण शेतकरी विरोधी असल्याचे दिसून येत आहे परंतु शेतकरी राजा जगला पाहिजे तो जगला तर देश जगेल टिकेल अशी भावना असणारे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एक मुखी निर्णायक असे सर्वेसर्वा दिलीपराव देशमुख यांनी शेतकऱ्याची पत मर्यादा वाढ आणि बिनव्याजी कर्ज धोरणानुसार प्रत्येक सभासदास पाच लाख रुपये पर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. यामुळे सभासदांनी बिनव्याजी कर्ज उचलण्यासाठी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था चेअरमन दत्तकुमार शिंदे यांच्याशी वेळोवेळी निघणार या संस्थेच्या धोरणानुसार सर्व शेतकऱ्यांना पत मर्यादा वाढविली आणि आर्थिक लाभ होणार आहे. यामुळे शेती सुधारणा आणि इतरही मोठे आर्थिक व्यवहार व्यवस्थितपणे पूर्ण होणार आहेत. याकरिता सभासदांनी संस्थेच्या पुढील आदेशापर्यंत वाट पाहण्याचे आव्हान भादा सोसायटीकडून सचिव भास्कर कांबळे, चेअरमन दत्तकुमार शिंदे याच्याडून करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments