महाराष्ट्र बंदला नळेगाव मध्ये चांगला प्रतिसाद; व्यापारी कामगाराचा कडकडीत बंद
नळेगाव:( प्रतिनिधी/बाळासाहेब बरचे) उत्तर भारतातील शेतकरी गेल्या अनेक महिन्यापासून आपल्या न्याय हक्कासाठी केंद्रातील मोदी सरकार विरोधात आंदोलन करीत आहेत. हे आंदोलन भाजपा सरकार तर्फे दडपण्याचा प्रयत्न होत आहे. लखीमपूर खोरी येथे घडलेल्या घटनेच्या निषेर्धात महाविकास आघाडीच्या वतीने सोमवारी नळेगाव येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेऊन बंदला पाठिंबा दिला. सकाळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी देवांग्रा रोड ते दत्त मंदिर पर्यंत या मुख्य रस्त्यावरून शांततेत रॅली काढण्यात आली. व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात येत होते. या रॅलीत मा.जि. प.सदस्य रामराव बुदरे, सरपंच ताजोद्दीन घोरवाडे, उपसरपंच रवी शिरुरे, सं. गा. योजना सदस्य गणेश शिंधाळकर, बालाजी माचवे, पप्पू सावंत, दिगंबर बिराजदार, शंकर शेलार, शमीम कोतवाल, बी एम बिराजदार, दिनेश राजमाने आदी सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रॅलीचे शिवाजी चौक नळेगाव येथे सभेत रूपांतर झाले. बंद बाबत रामराव बुदरे यांनी माहिती दिली तर सूत्र संचलन पप्पू माचवे यांनी केले तर आभार अजगर मचकुरी यांनी मानले.
0 Comments