Latest News

6/recent/ticker-posts

औसा तालुक्यातील भादा येथे कोवीड लसीकरण मोहीम रात्री उशिरापर्यंत सुरूच; दिव्यांगासाठी घरपोच लसीकरण

औसा तालुक्यातील भादा येथे कोवीड लसीकरण मोहीम रात्री उशिरापर्यंत सुरूच; दिव्यांगासाठी घरपोच लसीकरण


बी डी उबाळे

औसा: तालुक्यातील भादा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत लसीकरण मोहीम जोरात सुरू असून याचा अनेक नागरिकांना लाभ होत आहे. औसा तालुक्यातील भादा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडून एक टीम निर्माण करण्यात आली असून या टीममध्ये आरोग्य सेविका कल्पना द्रुरुगकर, आरोग्य सेवक रवी कांबळे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील कार्यक्षेत्रातील आशा कार्यकर्त्या आणि अंगणवाडी सेविका मदतनीस, पर्यवेक्षिका यांचा समावेश असून या गावांमध्ये विविध ठिकाणी हे लशिकरण गेल्या दोन दिवसापासून रोज रात्री आठ वाजेपर्यंत सुरू आहे. तर दिव्यांगासाठी घरी जाऊन लसीकरण केले जात आहे. यामुळे भादा गावातील प्रत्येक भागात सोमवार दि 11 ऑक्टोबर 2021 रोजी शिवाजी नगर भागातील 142 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले तर मंगळवार दि 12 ऑक्टोबर 2021 रोजी आनंद नगर भागात 230 नागरिकांचे लसीकरणाच्या ठिकाणी लसीकरण करण्यात आले आहे. यामुळे येत्या काही दिवसांमध्ये गावातील लसीकरण पूर्ण नागरिकांना होईल अशी अपेक्षा लसीकणातील सहभाग कर्मचारी व्यक्त करीत आहेत.

Post a Comment

0 Comments