निराधार योजनेच्या निकषात बदल करावा; ऑल इंडिया मुस्लिम ओ.बि.सी संघटनेची मागणी
के वाय पटवेकर
लातूर: अहमदपुरचे माजी उपनगराध्यक्ष व ऑल इंडिया मुस्लिम ओ.बि.सी संघटनेचे जिल्हाध्यक्ष व संजय गांधी निराधार योजनेचे (अहमदपुर) सदस्य शेख कलिमोद्दिन अहमद यांनी, लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बि.पी. यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली. याबाबतित सविस्तर वृत्त असे की, निराधार योजनेत सध्या दारिद्र रेषा क्रमांक प्रमाणपत्रात ज्यांची नोंद नाही त्यांना २१००० रू वार्षिक उत्पन्न मर्यादा ठेवली आहे. ति उत्पन्न मर्यादा वाढवून ४०००० रू वार्षक करावी व दारीद्र्य रेषा प्रमाणपत्रावर कूटंबातील सर्व सदस्यांचा उल्लेख नसलेल्या व काही सदस्यांच्या नावात झालेल्या चूकिच्या उल्लेखा संदर्भात तहसिलदारांनी योग्य ति शहानिशा करून शपथपत्रावर अर्ज मंजूर करावा व जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळवुन देण्यासाठी परिपत्रकातील शब्दांचा सकारात्मक अर्थ घेण्याचे निर्देश द्यावेत तसेच संजय गांधी विधवा योजनेत देण्यात येणारे अनुदान एका अपत्यास १०० व दोन पेक्षा जास्त अपत्यास २०० असे आहे. हे अनुदान तुटपुंजे असुन चरितार्थ चालवण्यास अपुरे आहे. ते अनुदान वाढवुन एका अपत्यास ५०० व दोन पेक्षा जास्त अपत्यास १००० असे एकूण १५०० ते २००० करावे. या मागण्यांसाठी माजी उपनगराध्यक्षांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट भेऊन लेखी निवेदन दिले. तसेच या मागणी संदर्भात लवकरच पालकमंत्री अमित देशमुख यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी प्रथ्वीराज बी पी यांनी सकारात्मक दृष्टीकोन दाखवत निवेदनातील मागण्या शासनापुढे मांडण्याचे आश्वासन दिले. यावेळी केदार काडवादे, प्रफूल्ल ढवळे, अलाउद्दीन किनिवाले, रूपेश कांबळे, शेख इरफान आदी उपस्थित होते.
अहमदपूर तालुक्यासह मोठ्या गावांमध्ये प्रतिनिधी नियुक्त करणे आहे इच्छुकांनी संपर्क साधावा.
0 Comments