Latest News

6/recent/ticker-posts

देवणी येथे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचा वाढदिवस उत्साहात

देवणी येथे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचा वाढदिवस उत्साहात

   



                            

देवणी:(प्रतिनिधी/विक्रम गायकवाड) माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या वाढदिवसानिमित्त  देवणी येथे चंद्रकांत मोठेराव व त्यांच्या मित्र परिवारा तर्फे कोरोना योद्धा म्हणजेच देवणी शहरातील डॉक्टर्स तसेच गुणवंत विद्यार्थी व विविध श्रेत्रातील गुणवंत व्यक्तिमत्तवांचा सत्कार करून त्यांचे कौतुक करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष उदगीर व देवणी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गोविंदराव भोपणीकर हे होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष प्रा. डॉ. अनिल इंगोले, लिंगायत महासंघाचे तालुका अध्यक्ष शेषेराव मानकरी तसेच  मालबा घोणशे, रामराव मोरे, देवणीचे पोलीस उपनिरीक्षिक शेख, लासोना येथील उपसरपंच अंकुश माने, देवणीचे माजी सरपंच देविदास पतंगे, देवणी काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष जावेद तांबोळी, मोजम उंटवाले आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी कोरोना काळात आपल्या जीवाची, परिवारची कुठलीही पर्वा न करता प्रामाणिकपणे वैद्यकिय सेवा देणारे डॉ. मोघेकर, डॉ.संतोष बिरादार, डॉ. घोरपडे, डॉ. जनवाडकर, देवणी येथील बावगे मेडिकल स्टोअर्सचे मालक बावगे, दिव्यकिरण चंद्रकांत मोठेराव, विजयाताई देवणीकर, जावेद तांबोळी, अमरदीप बोरे, श्री मालबा घोणशे तळेगावकर, वकील दयानंद कालिदासराव देवणे, मंथन अंकुशराव कोणाळे, विकास भरतराव बिरादार पाटील, वेदिका मरपल्ले, आदर्श शिक्षक प्रशांत बिरादार, पार्थ राजपाल बिरादार, आदर्श शिक्षिका सौ. सरोजा सूर्यवंशी, सौ. शिळवनीकर मॅडम इत्यादी, मान्यवरांचा यथोचित सत्कार करून सन्मान करण्यात आला.     या कार्यक्रमाचे संयोजक चंद्रकांत मोठेराव यांनी प्रास्ताविक केले तर सूत्रसंचलन रसिका महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा ग्रंथपाल प्रा. डॉ. शिवाजी सोनटक्के यांनी केले. या वेळी प्रा. डॉ अनिल इंगोले, अमर बोरे, अंकुश माने व अंकुशराव कोनाळे  इत्यादींनी मनोगत व्यक्त केले तर अध्यक्षीय समारोप  गोविंदरावजी भोपणीकर यांनी केले व आभार माजी सरपंच देविदास पतंगे यांनी मानले.


देवणी तालुक्यात मोठ्या गावाच्या ठिकाणी प्रतिनिधी नियुक्त करणे आहे इच्छुकांनी संपर्क साधावा

Post a Comment

0 Comments