निटूर येथे शेतकऱ्याचा मुद्दा पुढे करत दोन दिवस व्यापाऱ्यांचा बंद
निटुर:(प्रतिनिधी/रमेश लांबोटे) निलंगा तालुक्यातील निटुर येथे सोमवारी महाविकास आघाडीच्या वतीने लखिंपुर उत्तर प्रदेश येथे शेतकऱ्या अंगावर ट्रॅक्टर घालणाऱ्या मंत्री पुत्रास तात्काळ अटक करून शिक्षा देण्यात यावी यासाठी महा विकास आघाडी सरकार तर्फे महाराष्ट्र बंद होता त्याला प्रतिसाद देत सोमवारी निटुर(मोड) कडकडीत बंद तर निटूर व्यापाऱ्यांनी संमिश्र प्रतिसाद दिल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यानंतर आज मगळवारी निटुर येथील व्यापाऱ्यांची दुकाने बंद होती. आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी लातूर येथे शेतकऱ्याला मदत मिळावी यासाठी 72 तास अन्नत्याग आंदोलन सुरू केले असून त्याला पाठिंबा देण्यासाठी निटूर येथे काही व्यापाऱ्याने आपली दुकाने बंद करून शेतकऱ्याच्या 72 तासाच्या आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद दिला असल्याचे चित्र आज मंगळवारी निटूर येथे पहावयास मिळाले एक दिवस महाविकासआघाडी ने तर दुसऱ्या दिवशी भाजपच्या वतीने पुकारलेल्या बंदमुळे व्यापारी वर्गाची चांगलीच तारांबळ उडाली होती.
0 Comments