सोयाबीन काढणीच्या बांधावर जाऊन निटूर आरोग्य विभागाने केले लसीकरण
गाव,तांडे,शेतात काम करणाऱ्या शेतमजुर,कामगारना लसीकरणाचे महत्त्व पटवून देऊन लसीकरण
निटुर:( प्रतिनिधी/रमेश लांबोटे ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या वाडी-वस्तीवर लहान गाव,तांडे,शेतात काम करणारे शेतमजूर, कामगार यांना लसीकरणाचे महत्त्व पटवून देऊन लसीकरण मोहीम शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी आरोग्य विभाग कामाला लागले असल्याचे दिसून येत आहे. निटुर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी श्रीनिवास मोरे व त्यांची पत्नी डॉ.सौ. मोरे या दांपत्य यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी वाडी,वस्ती,तांडा व शेतामध्ये जाऊन लसीकरण करत आहेत. डांगेवाडी शिवारात सोयाबीन काढण्यासाठी गेलेल्या शेतमजुरांना शेतात जाऊन लसीकरण निटुर प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी बी जी धनेधर व श्रीमती पिठले यांनी लसीकरण केले. लवकरच सर्व परिसरातील खेडो-पाडी जाऊन लसीकरण पूर्ण करण्याचा मानस असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले. जनतेने याला सकारात्मक प्रतिसाद द्यावे व लसीकरण करून घ्यावे असे आरोग्य विभागाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.
0 Comments