Latest News

6/recent/ticker-posts

विद्यार्थ्यांच्या मागण्यांचे ना.संजय बनसोडे यांना निवेदन

विद्यार्थ्यांच्या मागण्यांचे ना.संजय बनसोडे यांना निवेदन


इरफान शेख 

उस्मानाबाद: महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक  बांधकाम, पाणी पुरवठा पर्यावरण,भूकंप-पुनर्वसन मंत्री राज्य मंत्री ना.संजय बनसोडे हे शुगर कारखाना कसबे तडवळे, ता. उस्मनाबाद येते आले असता उस्मानाबाद राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हा सचिव ऋषिकेश नारायण कदम पाटील यांनी मंत्री महोदयांना विद्यार्थ्यांना मागण्यांचे निवेदन दिले. निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की गेल्या चार पाच वर्षापासून राज्यातील शासकीय नोकरी भरतीसाठी शासनाने नमुद केलेला भूकंपग्रस्त आरक्षणाचा 2% जो कोटा आहे तो पूर्णपणे भरलेला नसुन येणाऱ्या काळात होणाऱ्या पोलिस भरती, जिल्हा परीषद, तलाठी, ग्रामसेवक अश्या अनेक प्रकारच्या वर्ग 3 आणि वर्ग 4 मध्ये होणाऱ्या शासकीय नोकर भरतीसाठी भूकंपग्रस्त चा कोटा सर्व परीक्षेमध्ये पुर्ण  भरावा जेणेकरून बऱ्याच वर्षांपासून भूकंपग्रस्त विद्यार्थी शासकीय नोकरी पासून वंचित आहेत राज्य शासनाने शासकीय नोकरभरती मधील परीक्षा शुल्क हे सर्व सामान्य मुलांना जास्तीच होत असल्याने काही मुलाना परीक्षा शुल्क अभावी परीक्षा फॉर्म न भरल्यामुळे वंचित राहावे लागत आहे आपण विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावावेत अशी मागणी निवेदनाद्वारे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा सचिव ऋषिकेश नारायण कदम पाटील यांनी राज्यमंत्री बनसोडे यांच्याकडे केली आहे.

Post a Comment

0 Comments