Latest News

6/recent/ticker-posts

शिरोळ प्राथमिक आरोग्य उकेंद्रातील जनाबाई वाघमारे यांना सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका गौरव पुरस्कार

शिरोळ प्राथमिक आरोग्य उकेंद्रातील जनाबाई वाघमारे यांना सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका गौरव पुरस्कार


शिरोळ:( प्रतिनिधी/सलीमभाई पठाण ) निलंगा तालुक्यातील वळसांगवी येथील आशा कार्यकर्त्या जनाबाई महादु वाघमारे हे अंबुलगा प्राथमिक आरोग्य केंद्रातील शिरोळ प्राथमिक उपकेंद्रामधे कोरोना काळापासून ते आजपर्यंत 2021 या काळात स्वयंसेवका योजनेअंतर्गत केंद्रात सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका म्हणून कार्य केले आहेत. यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने डाॅ प्रतीभा येळकर यांच्या हस्ते त्यांच्या कार्याचा गौरव करत आरोग्य केंद्र स्तर प्रथम पुरस्काराणे त्यांचा गौरव करून त्यांचा सन्मान करण्यात आला. या सन्मान कार्यक्रमाला HA बंडगर टि. के, सिस्टर बाबन्ने यू. एन, येडले एस.एस, मुक्ताबाई जाधव, धोंडाबाई कांबळे, प्रयाग माने, वांजरवाडा आशा, वनिता कदम, जनाबाई वाघमारे, काटेजवळगा आशा, अनिता कांबळे, उषा करंजे व अंबुलगा, शिरोळ, आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचारी आशा तथा सामाजिक कार्यकर्ते रमेश लांबोटे यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments