महाराष्ट्र महाविद्यालयात मोफत नेत्र तपासणी शिबिर
निलंगा:( विशेष प्रतिनिधी/इरफान शेख ) मागील दिड दोन वर्षात कोरोना महामारी मुळे विद्यार्थ्यांचे महाविद्यालयात येऊन प्रत्यक्ष शिक्षण घेण्याच्या व्यवस्थेला खिळ बसली.यातुन पर्यायी ऑनलाईन शिक्षणाची सुरुवात झाली. ज्ञान घेण्याचे हे एक उत्तम माध्यम असले तरी ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थी तासन्तास मोबाईल, संगणक यावरती खिळुन बसू लागली, परिणामी अनेक विद्यार्थ्यांना डोळे व डोके यासंदर्भात अनंत अडचणी येऊ लागल्या. हाच धागा धरून महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा व मिरागी नेत्रालय, लातुर, पटेल ऑप्टिकल, निलंगा यांच्या संयुक्त विद्यमानाने नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन फित कापून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपूके यांनी केले. राष्ट्रीय छात्र सेनेचे मेजर व उपप्राचार्य डॉ. चंद्रकुमार कदम, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. प्रशांत गायकवाड, डॉ. गोविंद शिवशेट्टे उपस्थित होते या शिबीराच्या यशस्वीतेसाठी डॉ. पठाण, डॉ. नसिम पठाण, डॉ. मकसुद पटेल, फिरोज पटेल जुबेर पटेल, रेश्मा पटेल यांनी परिश्रम घेतले. महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नेत्रांची मोफत तपासणी करण्यात आली.
0 Comments