Latest News

6/recent/ticker-posts

शकील देशमुख जिल्हास्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित; ना.बनसोडे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

शकील देशमुख जिल्हास्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित; ना.बनसोडे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान


शिरूर अनंतपाळ: तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष पत्रकार शकील रसुलसाब देशमुख उजेडकर यांना राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान व मराठा सेवा संघातर्फे दिला जाणारा पत्रकारिता क्षेत्रातील जिल्हास्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार दि.२४ ऑक्टोबर रविवारी उदगीर येथील रघुकुल मंगल कार्यालयात राज्यमंत्री ना.संजय बनसोडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या प्रसंगी जिजाऊ प्रतिष्ठानचे राज्याध्यक्ष प्रा. विवेक सुकणे, उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार रामेश्वर गोरे,अजित पाटील, मारोती जाधव, बिपिन पाटील गोविंद शेळके,मराठा सेवा संघ उदगीरचे तालुकाध्यक्ष प्रदीप ढगे, ताहेर हुसेन, समीर शेख आदी मान्यवर उपस्थितीत होते. मराठा सेवा संघ शाखा उदगीर व जिजाऊ प्रतिष्ठान उदगीर तर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो.त्या अनुषंगाने पत्रकारितेमध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल दैनिक एकमतचे तालुका प्रतिनिधी शकील देशमुख यांना ना.बनसोडे व विविध मान्यवरांच्या हस्ते जिल्हास्तरीय आदर्श पुरस्काराने सन्मानित  करण्यात आले.पत्रकार देशमुख यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments