Latest News

6/recent/ticker-posts

निलंगा बस स्थानकात लागले महिला बचत गटाचे फराळाचे विक्री करणारे स्टॉल

निलंगा बस स्थानकात लागले महिला बचत गटाचे फराळाचे विक्री करणारे स्टॉल


के वाय पटवेकर

निलंगा: दिवाळी हा सण जवळ आला आहे. अगदी काही दिवसांमध्ये दिवाळी येणार आहे यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद) या अभियाना अंतर्गत महिला बचत गटाच्या वतीने निलंगा तालुक्यातील गाव व गावातील बचत गटाच्या महिलांनी स्वतः तयार केलेले अन्न पदार्थ फराळाचे लाडू चिवडा चकल्या पापड हे शहरातील बसस्थानकामध्ये विक्रीसाठी स्टॉल लावले आहेत. महिला बचत गटाच्या माध्यमातून स्थानकामध्ये अनेक फराळाचे स्टॉल फराळाची विक्री करत आहे त्यामध्ये मिठाई पापड लोणचं तूप असे खाद्यपदार्थ आहेत. या महिला बचत गटाच्या माध्यमातून बसस्थानकातील महिला-पुरुष ग्राहकांना घरी बनवलेल्या खाद्यपदार्थाची माहिती दिली जात आहे अगदी स्वच्छ व चांगले वस्तू वापरून व घरीच बनवलेले अन्नपदार्थ आहेत व बाजारातील दरापेक्षा कमी दरामध्ये याची विक्री आहे व खाण्यासाठी स्वादिष्ट आहेत या सुरू केलेल्या महिला बचत गटाच्या व्यवसायातून नक्कीच महिलांना आर्थिक साहाय्य होणार आहे व याची चवही नागरिकाला खाण्यासाठी मिळणार आहे. "मराठी अस्मितेचा इशारा" च्या प्रतिनिधीशी बोलताना सीआरपी सुनिता सागवे यांनी 31 ऑक्टोंबर पर्यंत स्टॉल चालू राहतील जास्तीत-जास्त ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments