भादा पोलिसांचे धाडसत्र सुरुच पुन्हा दोन गावात अवैध दारूविक्री वर छापे
शेख बी जी
औसा: तालुक्यातील मौजे भादा येथील पोलीस स्टेशनच्या हद्दीत आज ता.३ रोजी सकाळी अकरा ते दुपारी दोन च्या दरम्यान दोन ठिकाणी अवैध दारू विक्री होत असल्याचे समजताच भादा पोलिसांनी या दोन्ही ठिकाणी छापे टाकून अवैध दारू पकडली. पहिली कार्यवाही बोरगाव नकुलेश्वर येथे केली. येथील आरोपी दत्ता अंकुश अंबlड वय 22 वर्ष व नारायण अंकुश अंबlड हे शेतात गावठी हातभट्टी दारू विकताना मिळून आले, त्या ठिकाणाहून 20 लिटर गावठी दारू किंमत रु.1000/- चा माल जप्त करण्यात आला. यानंतर मौजे टाका येथे धाड टाकून येथील आरोपी गोविंद श्रीमंत साठे वय 52 वर्ष याचे घरी स्वयंपाकाचे गॅस शेगडी खाली खड्ड्यात लपवून ठेवलेल्या देशी दारूच्या 32 बाटल्या किंमत रु. 960 चा माल जप्त करण्यात आला. ही कामगीरी पो अधिक्षक व अपर पो अधिक्षक, व डी वाय एस पी यांच्या मार्गदर्शनाखाली, ए पी आय विलास नवले, पी एस आय शिंदे, हेड कॉन्स्टेबल गिरी, डोलारे ,फड, चव्हाण,दिंडे आदी यांनी केली आहे. पोलिसांच्या या कार्यवाहीचे सर्वत्र स्वागत होत आहे.

0 Comments