लातूर येथील सहा रिक्त चालक पोलिस शिपायाच्या पदासाठी २३ उमेदवार मैदानी चाचणीत २३ पैकी १८ उमेदवार पात्र
चालक पोलिस भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने सुरु
लातूर: लातूर पोलिस दलाच्या आस्थापनेवर ६ रिक्त असलेल्या चालक पोलिस शिपायांच्या पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली असून २६ व २७ ऑक्टोबर रोजी २३ उमेदवार बाभळगाव रोडवरील पोलिस मुख्यालय येथे भरतीसाठी हजर झाले होते. १६०० मिटर धावणे व गोळाफेक या मैदानी चाचणीत १८ उमेदवार पात्र ठरले आहेत. तर ५ उमेदवार हे अपात्र ठरले आहेत. या भरती दरम्यान उमेदवारांची कागदपत्र पडताळणी, शारिरीक मोजमाप व शारिरीक चाचणी प्रक्रिया घेण्यात आली. मैदानी चाचणीत उमेदवारांना प्राप्त झालेल्या गुणांची तात्पूरती यादी लातूर पोलिसच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही चालक पोलिस भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पदध्तीने सुरु आहे. मैदानावर सीसीटीव्ही कॅमेरे असून व्हिडिओग्राफी करण्यात आली आहे. उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये, तसेच कोणी विशलेबाजी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांविरूद्ध कार्यवाही करण्यात येईल, असे पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी म्हटले आहे.
0 Comments