Latest News

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय ट्रेडिशनल रेसलिंग क्रीडा स्पर्धेसाठी नांदेड जिल्ह्यातील खेळाडूं गोवा येथे होणाऱ्या स्पर्धेला रवाना

राष्ट्रीय ट्रेडिशनल रेसलिंग क्रीडा स्पर्धेसाठी नांदेड जिल्ह्यातील खेळाडूं गोवा येथे होणाऱ्या स्पर्धेला रवाना


नांदेड:( प्रतिनिधी ) दि. 29 व 31 ऑक्टोबर 2021 दरम्यान गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय ट्रेडिशनल रेसलिंग क्रीडा स्पर्धा 2021-22 नांदेड जिल्ह्यातील खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली असून सर्व खेळाडू हे नांदेड जिल्ह्यातील आहेत निवड झालेल्या सर्व खेळाडूं आज राष्ट्रीय स्पर्धेसाठी आज दिनांक 28 ऑक्टोंबर 2021 रोजी भोकर रेल्वे स्टेशन येथून नंदिग्राम एक्सप्रेस नी रवाना होणार आहेत निवड झालेल्या खेळाडूमध्ये कु.पार्वती प्रेमसिंग चव्हाण, ईशा उमेश लोखंडे, कु. विनिता विश्वनाथ पेटकर, कु. इशिका इंदल जाधव, कु.आदिती प्रवीणराव बोरकर, सुयोग गोपीनाथ सूर्यवंशी, आदित्य राजेश्‍वर पाटील, विर पवन चेपुरवार, यश हनुमान कोवे, विवेक राजेश सावते, देवेश उमेश लोखंडे, रामानुज संजयकुमार बाच्चेवाड या खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली असून या वेळी सर्व खेळाडूंना गोवा येथे होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यासाठी विजन एज्युकेशन पॉईंट भोकर चे संचालक रातोळे , तसेच ज्येष्ठ पत्रकार उत्तम बाबळे, ज्ञानवर्धनि मुक्ताई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष पिराजी एल. गाडेकर तसेच राज्यस्तरीय पंच भुजंग पि.चिट्ठेवार, कु.सुदा डी.एडके, विशाल आर. गायकवाड, नितीन डी.देडे, कु.सलोनी वि.सुरदसे, कु.राणी के.जाधव तसेच सर्व पालक यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या या संघासोबत मुख्य प्रशिक्षक तथा ट्रेडिशनल  रेसलिंग असोसिएशन नांदेड जिल्हा सचिव  बालाजी एल. गाडेकर, दीपक बी.लोणवाडे बारडकर, महिला प्रशिक्षक कु.पार्वती प्रेमसिंग चव्हाण संघा सोबत राहणार आहेत. गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय  क्रीडा स्पर्धेसाठी नांदेड जिल्ह्याचे हौशी ॲथलेटिक्स संघटने चे सचिव प्रलोभ कुलकर्णी, विश्वंभर पवार पाटील नाम फाउंडेशन, भोकर चे अध्यक्ष यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments