रिपाई तालुका देवणी च्या दणक्यानंतर प्रशासनाला जाग
देवणी ( प्रतीनीधी/पुष्पक सूर्यवंशी ) दि. 27 ऑक्टोबर 2021 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आ) ता.देवणी जि.लातुर च्या वतीने देवणी नगर पंचायत समोर प्रचंड धरणे आंदोलन करण्यात आले,देवणी नगर पंचायत हद्दीत असलेल्या फुले नगर येथील दलित वस्ती शेजारी नगर पंचायतीकडून संपूर्ण शहरातून संकलन केलेला घाण कचरा टाकण्यात येत होता सदरील प्रकरण समजताच देवणी नगर पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन बेमुदत धरने आंदोलन करण्यात आले, आंदोलनाच्या पहिल्यांच दिवशी प्रशासनाकडून गंभीर दखल घेऊन सदरील कचरा संकलन करण्याचे ठिकाण इतरत्र हटविण्याचे लेखी पत्र देण्यात आले.यावेळी देवणी तालुका अध्यक्ष गणेशभाऊ कांबळे दवणहिप्परगेकर, उपाध्यक्ष धनराज गायकवाड, शहराध्यक्ष विक्रम गायकवाड, युवा अध्यक्ष भिमदर्शन बोरे, कार्याध्यक्ष विवेक कांबळे, ग्रामीण अध्यक्ष रोहीत डोंगरे, सचिव पुष्पक सूर्यवंशी, दिपक कांबळे, विठ्ठल गायकवाड,समाधान वाघमारे, नीळकंठ डोंगरे, करण होनमाने, महादेव होनमाने, नितीन पंतगे सह इतरही कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरील आंदोलनांस भाजपा तालुका अध्यक्ष काशीनाथ अण्णा गरीबे यांनीही भेट दिली.
0 Comments