Latest News

6/recent/ticker-posts

रस्त्यांवरील खड्ड्यात बेशरमाचे झाड व फुलांचे हार घालून निषेध

रस्त्यांवरील खड्ड्यात बेशरमाचे झाड व फुलांचे हार घालून निषेध



निलंगा:(विशेष प्रतिनिधी/इरफान शेख) निलंगा येथील रस्त्यावर पडलेल्या खड्डयांनी त्रस्त युवकांनी खड्ड्यात चक्क बेशरमाचे झाड व हार घालून नगरपालिकेचा निषेध केला. निलंगा शहरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे सध्या शाळा व महाविद्यालय सुरू झाले आहेत खड्ड्यामुळे विद्यार्थीनाही तारेवरची कसरत करावी लागत आहे याविषयी अनेक वेळा निवेदने देऊनही योग्य ती दखल नगरपालिके मार्फत घेण्यात आली नाही म्हणून शहरातील त्रस्त यौवकांनी चक्क खड्ड्यात बेशरमाचे झाड लावून खड्ड्याला पुष्पहार घालून नगरपालिकेचा निषेध करत बेशरम निलंगा नगरपालिकेचा धिक्कार असो, निर्लज्ज नगरपालिकेचा धिक्कार असो अशा घोषणाही दिल्या. यावेळी मुजीब सौदागर, मदन बिरादार, मुस्तफा शेख, सब्दर कादरी, गिरीष पात्रे, इस्माईल खुरेशी, आमिर पठाण, अमोल कांबळे, धीरज गायकवाड, सुनिल सूर्यवंशी, अविनाश बिरादार, नागेश राघो,शिंदे करण, वाहेद खुरेशी, देवदत्त सूर्यवंशी, आमिर सय्यद, किशन आर्य आदीं उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments