नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा अंतर्गत बियाणे वाटप
निलंगा:( विशेष प्रतिनिधी/इरफान शेख ) नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पा अंतर्गत 100% अनुदानावर 140 बॅग हरभरा बियाणे कोतल शिवणी येथे वाटप करण्यात आले. तसेच हवामान अनुकूल बियाणे अवलंब या घटका अंतर्गत फुले विक्रम वानाचे पायाभूत बियाणे कृषी विभाग व अॅग्रोमार्ट प्रोड्युसर कंपनी लातूर व ग्रामपंचायत कार्यालय शिवणी को. यांच्या संयुक्त विद्यमाने शेतक-यांना वितरित केले. कार्यक्रमास सरपंच श्री नाना पटील, वसंतराव पाटील, तानाजी पाटील ,कृषि सहाय्यक सौ. बिरादार एस ए, शेख जी.आर व तसेच गावातील शेतकरी रमेश शेळके, ज्ञानदेव वाघमारे, विठ्ठल शेळके, प्रशांत शेळके, आदिनाथ औरादे, सोपान पाटील, इद्रजीत पाटील, ज्ञानेश्वर शेळके, नागनाथ दुधभाते, संजय औरादे, नंदुकिशोर दुधभाते, गजानन शेळके व तसेच गावातील समस्त शेतकरी उपस्थित होते. पारंपारिक शेती न करता आता शेतकरी आधुनिक शेतीकडे वळत आहे. या वेळी हरभरा पिकपेरणी ते काढणी पर्यंत काय करावे या विषयी मार्गदर्शन करण्यात आले.
0 Comments