Latest News

6/recent/ticker-posts

माळी सेवा संघ निलंगा तालुका कार्यकारणी जाहीर

माळी सेवा संघ निलंगा तालुका कार्यकारणी जाहीर


इरफान शेख

निलंगा: येथे माळी समाजाच्या तालुकास्तरीय मेळाव्यामध्ये माळी सेवा संघाची नवीन कार्यकारणी जाहीर झाली. त्यामध्ये निवड झालेल्या सर्व सन्माननीय बांधवांना राज्य कार्यकारणी च्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. कार्यकारिणी अध्यक्ष:विठ्ठल चांबारगे, उपाध्यक्ष: शाहूराज मिरखलकर, कोषाध्यक्ष: सतीश कोरके, सचिव: माधव पेठकर, सदस्य: विनायक सूर्यकर, मनोज पेठकर, शिवाजी शेळगे, महेश शिरसागर, धनराज वाघमारे, लक्ष्मण फुलसुंदर सल्लागार: मोहन नटवे, विजयकुमार पेटकर, अ‍ॅड. पद्माकर पेठकर, माळी सेवा संघाच्या महिला तालुकाध्यक्ष श्रीमती मंगल दवणे, उद्योजक कक्षाचे अध्यक्ष नवनाथ पेठकर, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव वाघमारे कोतल शिवणीकर यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष दयानंद चोपणे, राज्याध्यक्ष पद्माकर वाघमारे, राज्य सचिव भारत काळे, राज्य उपाध्यक्ष श्रावणजी उगले, राज्य प्रवक्ते दत्तात्रय दापके, राज्य सदस्य पापासाहेब यादव, सुरेंद्र तिडके, गोंदरकर, नितीन यादव विभागीय अध्यक्ष अभिमन्यू पाखरसंगवे, माजी नगराध्यक्षा सुनीता ताई चोपणे, प्राचार्य राम पेटकर, डॉ. मिथुन जाधव व माळी समाज बांधवांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव पेठकर यांनी तर आभार महेश शिरसागर यांनी मानले.

Post a Comment

0 Comments