Latest News

6/recent/ticker-posts

शुद्ध पाण्यासाठी भादा ग्रामपंचायतीला दिला ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा

शुद्ध पाण्यासाठी भादा ग्रामपंचायतीला दिला ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा


शेख बी जी.

लातूर: दि.१६ औसा तालुक्यातील मौजे भादा येथे नळाला येणारे पाणी गढूळ व अशुद्ध असल्याने येथील ग्रामस्थांनी शुद्ध पाणी मिळावे यासाठी  ग्रामपंचायतीला उपोषणाचा इशारा दिला आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते फारुख पठाण व गावातील नागरिकांनी सरपंच मीनाबाई दरेकर यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, गावात मागील अनेक दिवसापासून नळाला येणारे पाणी हे अशुद्ध आहे यासाठी ग्रामपंचायतीने शुद्ध पाणी मिळावे यासाठी पंचायत समितीकडे पाठपुरावा करून गावासाठी शुद्ध पाणी मिळावे अशी व्यवस्था करावी. अशाप्रकारची विनंती निवेदनात केले आहे. पुढे निवेदनात असे म्हणण्यात आले आहे की जर ही व्यवस्था होत नसेल तर ग्रामस्थांसह ग्रामपंचायतीसमोर उपोषण करण्यात येईल. अशा प्रकारचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते फारुख पठाण व ग्रामस्थांच्या स्वाक्षर्‍या आहेत. येथील ग्राम विकास अधिकारी माणिक सूर्यवंशी यांनी असे अभिवचन दिले आहे की येणाऱ्या काळात आपल्या गावांमध्ये शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी फिल्टर प्लाट उपलब्ध करून देऊ.

Post a Comment

0 Comments