वाचन प्रेरणा दिनानिमित्त देवणीत पुस्तक भेट सोहळा संपन्न.
देवणी:(प्रतिनिधी/विक्रम गायकवाड) कै. रसिका महाविद्यालयात माजी राष्ट्रपती स्वर्गीय डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून वाचनास चालना मिळावी, वाचकांनी पुस्तकांची कास धरावी तसेच विविध सण, उत्सवाच्या, वाढदिसानिमित्त एकमेकांना चांगली पुस्तके भेट देण्याची प्रथा पडावी म्हणून रसिका महाविद्यालयाचे ग्रंथपाल तथा उपप्राचार्य डॉ. शिवाजी सोनटक्के यांनी उपस्थित सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांना प्रत्येकी एक पुस्तक भेट दिली. ग्रंथालय विभागाच्या वतीने संशोधन पद्धती वरील विविध ग्रंथांचे "ग्रंथप्रदर्शन" भरविण्यात आले. प्रस्तूत ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद तसेच संशोधकांनी उस्फुर्तपणे घेतला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत जावळे पाटील यांनी प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपापल्या जन्म दिवशी एक पुस्तक भेट देण्याचे आवाहन करीत मनोगत व्यक्त केले. यावेळी प्राचार्य डॉ. चंद्रकांत जावळे पाटील, महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. ग्रंथालय विभागाच्या वतीने ग्रंथपाल तथा उपप्राचार्य डॉ. शिवाजी सोनटक्के यांनी उपस्थितांचे आभार मानले.
देवणी तालुक्यातील मोठ्या गावच्या ठिकाणी प्रतिनिधी नियुक्त करणे आहे इच्छुकांनी संपर्क साधावा.
0 Comments