Latest News

6/recent/ticker-posts

केळगाव येथे डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी

केळगाव येथे डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी 


अंबुलगा:(प्रतिनिधी/भरत चव्हाण) निलंगा तालुक्यातील केळगाव येथे आज शुक्रवारी डॉ एपीजे अब्दुल कलाम चौकांमध्ये ग्रामस्थांच्यावतीने आज भारताचे माजी राष्ट्रपती स्वर्गीय डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रथमता डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस गावचे नागरिक किसन पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले व त्यानंतर एपीजे कलाम चौकातील नामफलक येथे केळगाव चे माजी सरपंच शकील पांढरे माजी तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर चव्हाण विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन शिवाजी चव्हाण जोहर पांढरे, शंकर चव्हाण, पत्रकार बालाजी कांबळे, हैदर डाळिंबकर, मोहम्मद डाळिंबकर, भिकाजी कांबळे, अझर पांढरे, मुजिम डाळिंबकर, बालाजी पाटील, रहीम पटेल, रमजान सय्यदपुरे, प्रताप पाटील, गोविंद सूर्यवंशी, जिलानी मुजावर, शकील पटेल, मोसिन पांढरे, असलम साहेब, असिम पटेल, सहा ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात भारताचे स्वर्गीय माझी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन केले. यावेळी प्रस्तावना पत्रकार जावेद मुजावर यांनी केली तर उपस्थित मान्यवरांनी डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला.

Post a Comment

0 Comments