Latest News

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रूपाली ठोंबरे पाटील यांची "मराठी अस्मितेचा इशारा" परिवाराने घेतली पुणे येथे भेट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रूपाली ठोंबरे पाटील यांची "मराठी अस्मितेचा इशारा" परिवाराने घेतली पुणे येथे भेट 


प्रा. बि. जी. शेख

लातूर: पुणे येथे अ‍ॅड रूपाली ठोंबरे पाटील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्या, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तथा झांशीची राणी प्रतिष्ठान अध्यक्षा,पुणे यांची त्यांच्या कार्यालयत "मराठी अस्मितेच्या इशारा" परिवाराने भेट घेतली यामध्ये संपादक के वाय पटवेकर, इशारा न्यूज समूहाचे पत्रकार रमेश लांबोटे, महेश पवार यांनी भेट घेऊन महिला स्वसंरक्षण शिबीर व वृत्तपत्राशी निगडित याविषयी चर्चा केली. विद्यालयीन व महाविद्यालयीन मुलींना स्वयम् आत्मरक्षण (स्वसंरक्षण) करण्यासाठी व त्यांना सशक्त बनवण्यासाठी महिला स्वसंरक्षण शिबिर,मैदानी खेळ, व्यायाम व आत्मरक्षणाचे धडे देणे काळाची गरज आहे यामुळे मुली आपला बचाव संकटकाळी करू शकतात याविषयी चर्चा करण्यात आली.



Post a Comment

0 Comments