निटुर पोलिस चौकीचे सत्यवान कांबळे यांच्या धाडीमुळे अवैध धंदेवाल्यांची धाबे दणाणले; 4800 रुपयांचा मुद्देमाल जप्त
निटूर:{ प्रतिनिधी/रमेश लांबोटे } निलंगा तालुक्यातील निटुर येथील शिरूर आनंतपाळ पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या पोलिस चौकीचे बीट अंमलदार सत्यवान कांबळे यांनी मागील अनेक दिवसांपासून अवैध रित्या दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्यावर धाडी टाकून कारवाया करण्याचे सत्र सुरू केले आहे. यामुळे छुप्या मार्गाने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. शिरूर आनंतपाळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुडके व पोलीस अधीक्षक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आज गुरुवारी दुपारी 11:00 वाजता निटुर पोलीस चौकीचे बीट अंमलदार सत्यवान कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल हरी कांबळवाड पोलीस कॉन्स्टेबल शिवानंद गिरबोने यांच्या पथकाने निटुर व माचरटवाडी येथे छापा टाकून 4800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यात देशी दारू सिमला संत्रा कंपनीच्या 80 बॉटल मिळाले आहेत. यामध्ये आरोपी बाबुराव खंडू बुरकुले, प्रताप शामराव शिंदे, दत्तात्रय नागनाथ माने सर्व राहणार निटूर व प्रवीण नामदेव नागिमे राहणार माचरटवाडी एक असे चार आरोपी वर दारूबंदी कायदा कलमानुसार गुन्हा दाखल दाखल करून पुढील तपास बीट अंमलदार सत्यवान कांबळे हे करीत आहेत. मागील काही दिवसापासून निटूर पोलिसांचा अवैध रित्या व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकावर छुप्या पद्धतीने छापे टाकून धाडसत्र सुरू आहे. तरी परिसरात छुप्या मार्गाने मार्गाने दारू विक्री जोमात चालूच आहे. हे धाडसत्र असेच चालू राहणार की, चार आरोपींना पकडून बाकीच्यांना अभय दिला जाणार ? असे दबक्या आवाजात ग्रामस्थ चर्चा करत आहेत.
0 Comments