Latest News

6/recent/ticker-posts

देवणी तालुक्यातील 101 बचत गटांना सुमारे दोन कोटी रुपयांचे कर्ज वाटप

देवणी तालुक्यातील 101 बचत गटांना सुमारे दोन कोटी रुपयांचे कर्ज वाटप


देवणी:( प्रतिनिधी/विक्रम गायकवाड़ ) तालुक्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद) अंतर्गत चालणाऱ्या 101 बचत गटांना देवणी येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या साह्याने आज पावेतो एकूण 2 कोटी रुपयांचे कर्ज वितरण झालेला आहे. त्यामुळे दि. 25/11/2021  SBI देवनी शाखेचे शाखा व्यवस्थापक श्री संभाजी शिवाजीराव टमके सर व क्षेत्रीय अधिकारी तुकाराम शिनगारे यांचा उमेद अभियाना मार्फत पंचायत समिती देवणी सभागृहामधे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) तथा VSTF नोडल अधिकारी माननीय दत्तात्रय गिरी सर यांच्या शुभ हस्ते प्रशस्तीपत्र सन्मान देऊन सत्कार करून गौरविण्यात आले. यावेळी उपस्थित सहाय्यक गटविकास अधिकारी कांबळे साहेब, उमेदचे तालुका व्यवस्थापक राजेंद्रप्रसाद विडप, प्रभाग समन्वयक लता बोनाकृती, सिद्धार्थ बेद्रे, सुखदेव मलवाड, VSTF देवणी तालुका समन्वयक सागर तापडिया, बँक सखी पंचशीला देवणीकर, जयश्री बेद्रे(CTC) आदीउपस्थित होते.

Post a Comment

0 Comments