कोकळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संविधान दिन साजरा
मदनसुरी:( प्रतिनिधी/ द्रोणाचार्य कोळी ) शुक्रवार दि.26 नोव्हेंबर रोजी निलंगा तालुक्यातील कोकळगाव येथील जि.प.प्रा.शाळेत संविधान दिन साजरा करण्यात आला.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक दीपक कांबळे, सहशिक्षक एम.आय.तांबोळी, व्ही.एस.चामे,वंदना कांबळे, यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरुवात प्रथमतः डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजनशाळेचे मुख्याध्यापक यांच्या हस्ते करण्यात आले .संविधांनविषयी कांही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तर शाळेचे शिक्षक व मुख्याध्यापक यांनी संविधान विषयी सखोल माहिती सांगून विद्यार्थ्यांना संविधान बाबत मार्गदर्शन केले. देशाच्या अगदी शेवटच्या नागरिकाला सुध्दा समता, स्वातंत्र,बंधुता, न्याय, मुलभूत हक्क,अधिकार बहाल करून,असंख्य विविध जाती-धर्मात विभागलेल्या भारताला आम्ही भारताचे नागरिक" म्हणून, एकसंघ राष्ट्रीयत्वाचे समान अधिकार आणि कर्तव्य बहाल करत जगामध्ये देशाचं सार्वभौम कायम टिकवून ठेवण्याचे काम संविधानाने केले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम.आय.तांबोळी व प्रस्तावना वंदना कांबळे तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक दीपक कांबळे यांनी केले.
0 Comments