Latest News

6/recent/ticker-posts

औसा तालुक्यामध्ये संविधान दिन साजरा

औसा तालुक्यामध्ये संविधान दिन साजरा 



बी डी उबाळे

औसा: औसा तालुक्यामध्ये आज दिनांक 26 नोव्हेंबर 2021 रोजी तालुक्यातील विविध गावांमध्ये संविधान दिन साजरा करण्यात आले. औसा तालुक्यातील भादा,शिवली सह इतर गावात संविधान दिन साजरा करण्यात आले. यावेळी "भारताचे संविधान"या उद्देशिका चे वाचन भांदा येथील ग्राम विकास अधिकारी माणिक सूर्यवंशी यांनी केले. यावेळी संविधान उद्देशिका "आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस: सामाजिक,आर्थिक व राजनैतिक न्याय,विचार,अभिव्यक्ती, विश्वास,श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य,दर्जाची व संधीची समानता, निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करुन, आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत." या उद्देशिकेचे वाचन सामूहिक रित्या करण्यात आले. यावेळी गावातील तंटामुक्त समिती अध्यक्ष सूर्यकांत पाटील,उपाध्यक्ष पांडुरंग कात्रे, ग्रामपंचायत सदस्य सुर्यकांत उबाळे,अमोल पाटील,तय्यब पठाण आदी सह नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments