Latest News

6/recent/ticker-posts

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा लातूर जिल्हा दौरा

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा लातूर जिल्हा दौरा 

  


लातूर:( जिमाका )दि. 24 - केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे गुरुवार, दि. 25 व शुक्रवार, दि. 26 नोव्हेंबर, 2021 या दोन दिवसाच्या लातूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील. गुरुवार, दि. 25 नोव्हेंबर, 2021 रोजी सकाळी 9:45 वाजता नागपूर विमानतळावरुन विशेष विमानाने सकाळी 10:30 वाजता लातूर विमानतळ येथे आगमन. 10:50  मोटारीने एम.आय.डी.सी. लातूर येथील कार्यक्रमास उपस्थिती. 11:00 वाजता विवेकानंद मेडिकल फाऊंडेशन ॲन्ड रिसर्च सेंटर, लातूर येथे आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1:00 वाजता मोटारीने औसा तालुक्यातील लोदगा ता. औसाकडे प्रयाण. दुपारी 1:30 ते दुपारी 2:00 वाजेपर्यंत लोदगा ता. औसा येथे राखीव. 3:00 वाजता लोदगा ता. औसा जि. लातूर येथील ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर ॲन्ड रिसर्च इनस्ट्यिुटच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. 3:30 वाजता मसलगा ता. निलंगा जि. लातूरकडे प्रयाण. 4:00 वाजता मसलगा ता. निलंगा जि. लातूर येथील पुलाची पाहणी कार्यक्रमास उपस्थिती. 4:30 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क, टाऊन हॉल लातूर येथील विविध कामांच्या भुमिपूजन व लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. सायंकाळी 5:45 वाजता एमआयडीसी लातूर येथील स्वयंसिध्दा महिला मंडळाच्‍या कार्यक्रमास उपस्थिती. 6:30 वाजता छत्रपती शाहू महाराज विद्यालय, लातूर येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्‍या कार्यक्रमास उपस्थिती. रात्री 7:15 वाजता एमआयटी मेडिकल कॉलेजजवळ, अंबेजोगाई रोड, लातूर येथील  आमदार रमेशअप्‍पा कराड यांच्‍या निवासस्‍थानी भेट. 7:45 वाजता ग्रँन्ड हॉटेलच्या पाठीमागे, पाखरसांगवी रोड, सुप्रिया निवास येथील खासदार सुधाकर शृंगारे यांच्‍या निवासस्‍थानी भेट. 8:15 वाजता शासकीय विश्रामगृह, रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ, औसा रोड, लातूर येथील हॉटेल न्‍यु गंधर्व गार्डनच्या उद्धाटन कार्यक्रमास उपस्थिती. 8:45 वाजता एल.आय.सी. कॉलनी, रिंगरोड, लातूर येथील आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निवासस्थानी भेट. शुक्रवार, दि. 26 नोव्‍हेंबर, 2021 रोजी सकाळी 7:30 वाजता लातूर येथील विशाल नगरजवळील, चिरंजीव क्लिनीकसमोरील आमदार अभिमन्‍यू पवार यांच्‍या निवासस्‍थानी भेट. 8:00 वाजता विशाल नगर, लातूर येथून लातूर मोटरीने विमानतळाकडे प्रयाण आणि 8:15 वाजता लातूर येथून विशेष विमानाने दिल्‍लीकडे प्रयाण करतील.

Post a Comment

0 Comments