यास्मिन शेख या विद्यार्थीनीने नीट परीक्षेमध्ये 651 गुण मिळवल्याबद्दल निटूर(मोड़) येथे सत्कार
निटुर:(प्रतिनिधी/रमेश लांबोटे) येथील यास्मिन शेख या मुस्लिम कुटुंबातील मुलीने नीट परीक्षेमध्ये 651 गुण घेऊन उज्ज्वल यश संपादन केल्याबद्दल आज निटुर(मोड) येथील पंकज फर्टिलायझर्स या दुकानात आ. संभाजीराव पाटील, आ.रमेशआप्पा कराड यांनी भेट दिली या वेळी निटुर गाव येथील यास्मिन शेख व त्याच्या वडिलांचा सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पंकज फर्टिलायझरचे मालक पंकज भालके, डांगेवाडीचे उपसरपंच गोविंद पाटील, बाबूलाल शेख, संजय दोरवे,विजय देशमुख, युसुफ़ शेख, धीरज भालके, संजय चव्हाण, आशीष पाटील, निखील लांबोटे, प्रताप सूडे, आमोल भालके सह ग्रामस्थ व भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments