शेतीला वीज द्या हो साहेब...अन्यथा आत्महत्या करू मौजे शिऊर येथील शेतकऱ्यांचा वीज वितरण कंपनीला निर्वाणीचा इशारा
शिरोळ:( प्रतिनिधी/सलीमभाई पठाण ) मौजे शिऊर ता.निलंगा येथे मीटर धारक शेतकरी असून त्यांच्या शेतीला सिंचनासाठी डीपी बसवला आहे. त्याच्या लगत गावामध्ये वीज पुरवठा करण्यासाठी सिंगल फेज चा एक डीपी आहे मात्र गावातील विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर सिंगल फेज ची डीपी नादुरुस्त झाल्यावर सदर शेतकऱ्यांच्या डीपीवरून गावात विद्युत पुरवठा केला जातो ओव्हरलोड मुळे मागील सहा महिन्यापासून हा डीपी बंद पडलेला आहे. जे मीटर धारक शेतकरी सदर डीपी वरून शेतीला सिंचनासाठी विजेचा वापर करतात त्यांची वीज पूर्णपणे खंडित झालेली आहे आणि मागील काही महिन्यापासून त्यांच्या शेतीला सिंचनाची कसलीच सुविधा नाही परिणामी हातातोंडाशी आलेले पीक वाळुन जात आहे. या संबंधीची तक्रार वीज वितरण कंपनीचे अंबुलगा येथे अभियंता यांच्याकडे मांडून सदर डीपी लवकर दुरुस्त करून द्यावा किंवा पर्यायी व्यवस्था करावी यासाठी आज शेतकऱ्यांनी लेखी तक्रार सादर केली परंतु प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी लाल फितीच्या कारभारात कमीत कमी सहा महिने तरी नवीन डीपी उपलब्ध होणार नाही असे सांगितले अगोदरच अतिवृष्टीने बेहाल झालेल्या शेतकऱ्यांनी आता सुलतानी संकट अंगावर आल्यावर त्यांच्यासमोर आत्महत्या हा एकच पर्याय उरला आहे असे सांगितले डीपी जर लवकर दुरुस्त नाही झाला तर वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर येऊन आत्मदहन करणार असा इशारा शेतकऱी राजकुमार रंडाळे यांनी दिला याप्रसंगी शिरुर गावचे शेतकरी यांनी आम्हीपण आत्मदहन करू असा निर्वाणीचा इशारा दिला. डीपी दुरुस्त नाही झाला तर होणाऱ्या दुर्घटनेला वीज वितरण प्रशासन जिम्मेदार राहील असे शेतकऱ्यांनी सांगितले. यावेळी सतीश साळुंके, रामचंद्र बंडगर, नरसिंग पाटील, प्रदीप तूगावे, पिरसाब सय्यद आणि गावकरी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर उपस्थित होते. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर शेतकऱ्यांची समस्या सोडवावी हीच मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.
0 Comments