भादा येथे "मिशन वात्सल्य" निमित्त गृहभेटी
बी डी उबाळे
औसा: औसा तालुक्यातील भादा येथे बसले मिशन या शासनाच्या राष्ट्रीय कार्यक्रमानुसार सोमवार दि. 22 नोव्हेंबर 2021रोजी भादा येथे मिशन वात्सल्य योजने अंतर्गत कोरोना मध्ये मृत्यू पावलेल्या कविता बालाजी शिंदे, मधुबाई प्रकाश एरंडे, गणू सुग्रीव उबाळे, जलील दस्तगीर शेख, महेबुब चांद शेख, वसंत शंकर शिंदे, विठ्ठल काशिनाथ भादेकर, मोहिते, भानुदास शिंदे, हुसेनाबी शेख व्यक्तींच्या घरी भेटी देवून त्यांची माहिती संकलित करून शासनास माहिती देण्यासाठी 10 घरांना भेटी देऊन माहिती संकलित करण्यात आली. यावेळी अंगणवाडी पर्यवेक्षिका सुचिता कटके, ग्रामविकास अधिकारी एम व्ही सूर्यवंशी, तलाठी माने, सरपंच मीनाबाई दरेकर,आरोग्य सेवक रवी कांबळे, अंगणवाडी कार्यकर्त्या कुसुम उबाळे, दैवशाला कात्रे, भागीर्थी पाटील आदी उपस्थित होते.
0 Comments