Latest News

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा येथे भुदल सैन्य प्रशिक्षण शिबीर

महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा येथे भुदल सैन्य प्रशिक्षण शिबीर


निलंगा:{ प्रतिनिधी/रमेश लांबोटे } भारतीय भुदल सैन्य दलाचे प्रशिक्षण शिबिर महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा जि. लातूर येथे दि. 24 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीमध्ये घेण्यात येत आहे. या प्रशिक्षण शिबिरामध्ये महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा येथील 33 विद्यार्थी, मास्टर दिनानाथ मंगेशकर महाविद्यालय, औराद येथील 22 विद्यार्थी, शिवाजी महाविद्यालय, उमरगा येथील 31 विद्यार्थी असे एकूण 86 विद्यार्थ्यांना भारतीय भुदल सैन्य दलाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये भारतीय सैन्य दलाचा इतिहास, भारतीय सैन्य दलाची रचना, आपत्ती व्यवस्थापन, अंतर्गत सेवा, सुरक्षा व्यवस्थापन, शस्त्र प्रशिक्षण (0.22 एम.एम. रायफल फायरिंग), अग्नीशमन प्रशिक्षण, आत्मरक्षा तथा नागरिक सेवा इत्यादींचे प्रशिक्षण या शिबीरामध्ये दिले जाणार आहे. या शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा एनसीसी अधिकारी मेजर डॉ. चंद्रकुमार कदम हे काम पाहत आहेत. महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर यांनी या सैन्य प्रशिक्षण शिबिरास हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपुके यांनी या शिबिराची जय्यत तयारी झाल्याचे मत व्यक्त केले आहे. या सैन्य प्रशिक्षण शिबिराची सुरुवात दि. 24 नोव्हेंबर 2021 रोजी, 53, महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी., लातूरचे कमांडिग ऑफीसर कर्नल सुनिल अब्राहम यांच्या बीजभाषणाने होत आहे. पी.आय.स्टाफ म्हणून सुभेदार डी. दामोर (गुजरात), हवालदार अशोककुमार (उत्तराखंड), हवालदार शिंदे (प. महाराष्ट्र) व त्यांचा चमुह निलंगा येथे दि. 23 नोव्हेंबर 2021 रोजी दाखल होत आहे.

Post a Comment

0 Comments