Latest News

6/recent/ticker-posts

सर्व समुदायातील श्रीमंत-गरीब विद्यार्थ्यांना एकत्र एकरुपी धाग्यामध्ये बांधुन ठेवण्याचे कार्य करते, एनसीसी- डॉ. जी.जी. शिवशेट्टे

सर्व समुदायातील श्रीमंत-गरीब विद्यार्थ्यांना एकत्र एकरुपी धाग्यामध्ये बांधुन ठेवण्याचे कार्य करते, एनसीसी- डॉ. जी.जी. शिवशेट्टे 


निलंगा:{ प्रतिनिधी/रमेशला लाबोटे } महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा येथे दि. 24 ते 30 नोव्हेंबर 2021 या वेळेत एनसीसी वार्षिक प्रशिक्षण शिबिर चालू आहे. महाविद्यालयाच्या हिंदी विभागातील डॉ. गोविंद शिवशेट्टे यांचे दि. 27.11.2021 रोजी “राष्ट्रीय एकता व नेतृत्वगुण” या विषयावर व्याख्यान झाले. या प्रसंगी बोलताना ते म्हणाले की, भारत एक विशाल देश आहे. येथील विभिन्न समुदायाचे विभिन्न संस्कृतीचे व विभिन्न जातीचे युवक वर्ग, एक भाषा एक बोली व सर्वसमान वेशभुषा धारण करुन एकत्र राहताना दिसत आहेत. सर्व समुदायातील श्रीमंत-गरीब विद्यार्थ्यांना एकत्र एकरुपी धाग्यामध्ये बांधुन ठेवण्याचे कार्य एनसीसी करते. एनसीसी खडतर प्रशिक्षणातुन राष्ट्रभक्तीने प्रेरित युवक एक प्रशिक्षित व अत्यंत कडक शिस्तीतील सुजान नागरिक देशाला मिळतो. असे मत डॉ. शिवशेट्टे यांनी यावेळी व्यक्त केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपुके, एनसीसी अधिकारी मेजर डॉ. चंद्रकुमार कदम, पीआय स्टाफ सुभेदार डी. दामोर, हवालदार पी. शिंदे, हवालदार सुखविंदर पाल, हवालदार राकेशकुमार यांची प्रमुख उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments