Latest News

6/recent/ticker-posts

एनसीसीचे प्रशिक्षण घेणारा महाविद्यालयीन विद्यार्थी तणावरहित जीवन जगतो- डॉ.गोपाळ मोघे

एनसीसीचे प्रशिक्षण घेणारा महाविद्यालयीन विद्यार्थी तणावरहित जीवन जगतो- डॉ.गोपाळ मोघे 


निलंगा:( विशेष प्रतिनिधी/इरफान शेख ) शालेय जीवनापासून ते वयोवृध्द अवस्थेतील नागरिकांपर्यंत शरीर स्वास्थ सुव्यवस्थित ठेवण्यासाठी प्रत्येकजन प्रयत्नरत असतो. सकाळी लवकर उठून व्यायाम, नाश्ता, दुपारचे जेवन, रात्रीची झोप या सर्व बाबीमध्ये नियमितता ठेवण्यासाठी कितीतरी प्रयत्न केले जातात. महाविद्यालयीन युवकांना जीवन जगण्याचे नियम शिकवताना प्रत्येक कुटुंबसंस्थेतील कुटुंब

प्रमुखाचा व आईवडीलांचा जीव मेटाकुटीला येतो. दुस-या बाजुला महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना राष्ट्रीय छात्र सेनेचे (एनसीसीचे) प्रशिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांमध्ये वरील सर्व बाबी सहजपणे साध्य होताना दिसतात. एनसीसीतील तीन वर्षाचा प्रशिक्षण कालावधी हा महाविद्यालयीन युवकांच्या जीवनशैलीमध्ये आमुलाग्र बदल घडवून आणतो. एनसीसीचे प्रशिक्षण घेतलेल्या युवकांचा बोलण्याचा, चालण्याचा व समाजामध्ये वावरण्याचा ढंगच निराळा असतो. त्यांच्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास दिसतो. महाविद्यालयीन पदवीचा अभ्यासक्रम पार पाडत असताना त्यासोबतच एनसीसीचे प्रशिक्षण घेणारा विद्यार्थी हा एक प्रकारे तणावविरहित जीवन जगतो असे मत महाराष्ट्र महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. गोपाळ मोघे यांनी एनसीसीच्या शिबिरार्थ्यांना उद्बोधन व्याख्यानामध्ये व्यक्त केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपुके, एनसीसी अधिकारी व महाविद्यालयाचे उपप्राचार्य मेजर डॉ. चंद्रकुमार कदम, शिबिराचे प्रशिक्षक सुभेदार डी. दामोर, हवालदार सुखविंदर पाल, हवालदार पी. शिंदे, हवालदार राकेश कुमार यांची प्रमुख उपस्थित होती.

Post a Comment

0 Comments