निलंगा येथील सेवानिवृत्त शिक्षक हळ्ळे प्रकाश वैजनाथ यांनी सपत्नीक अवयवदानाचा केला संकल्प
निलंगा:( प्रतिनिधी/रमेश लांबोटे ) मरावे परी कीर्तिरूपे उरावे या उक्तीप्रमाणे निलंगा शहरातील बँक कॉलनी रोड घाडगे नगर येथील सेवानिवृत्त शिक्षक हळ्ळे प्रकाश वैजनाथ सर व त्यांची पत्नी बापूरे संगीता या दोघांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला आहे. मृत्यूनंतरही हा देह मानवा च्या कल्याणासाठी उपयोगी पडावा ही प्रेरणा घेऊन हळ्ळे दाम्पत्यांनी देहदानाचा संकल्प केला आहे मृत्यू नंतर आपण आपल्या मौल्यवान अशा देहाची राखरांगोळी करून टाकतो त्यापेक्षा अवयवदान यामुळे या देहा मुळे गरजू लोकांना मदत होत असेल तर मरणाच्या दारातून एखादी व्यक्ती परत येत असेल तर अवयवय दाना सारखे महान कार्य दुसरे नाही हळ्ळे संगीताताई यांनी ही भावना व्यक्त केली इतरांच्या भल्यासाठी हा देह जावा असा विचार करणारी देव माणसं या माध्यमातून पाहायला मिळत आहेत त्यांच्या महान कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. द-फेडरेशन ऑफ ऑर्गण बाॅडी डोनेशन मुंबई निर्मल ग्राम व आदर्श गाव आनंदवाडी गौर तालुका निलंगा यांच्या प्रेरणेतून अवयवदान व देहदान गौर येथील चवरे आर सी यांच्या मदतीने हाळ्ळे, बापूरे ताईने देहदानाचा फॉर्म आज भरून दिला याप्रसंगी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे गुंडुरे डी बी, एम एम जाधव, किरण धुमाळ, आनंद जाधव, धुमाळ डी.एस, बिरादार डी.पी., बिरादार एस.जी., संजय घाडगे, सुंदर बोंडगे व अर्चना घाडगे यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
0 Comments