Latest News

6/recent/ticker-posts

गडकरी येणार याची कुणकुण लागताच प्रशासनास आली जाग;शिरोळ-निटुर रस्त्याची डागडुजी सुरू

गडकरी येणार याची कुणकुण लागताच प्रशासनास आली जाग;शिरोळ-निटुर रस्त्याची डागडुजी सुरू

     


 

शिरोळ:( प्रतिनिधी सलीमभाई पठाण ) केंद्रीय मंत्री नितींजी गडकरी यांचा मसलगा येथील उड्डाणपुलाच्या उद्घाटनासाठी ते येणार असल्याचे प्रशासनास अनौपचारिकरीत्या कळाले असल्यामुळे नियोजित दौरा सोबत गिरकचाळ येथील मांजरा नदीवरील प्रस्तावित पुलाच्या संदर्भात अचानक दौरा ठरल्यास निटुर ते शिरोळ "खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा"LLक याची जाणीव माननीय मंत्र्यांना होऊ नये यासाठी प्रशासनाकडून खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे वारंवार पाठपुरावा करूनही रस्त्याची दुरावस्था या प्रशासनाला कळली नाही मात्र मंत्र्यांचा दौरा अजून निश्चित नसतानासुद्धा रस्ता खड्डे बुजवून तात्पुरते डागडुजी करण्यात प्रशासन मग्न आहे मा.मंत्री महोदयांचा दौरा या रस्त्यावरून वारंवार व्हावा आणि त्या निमित्ताने का होईना रस्ता दुरुस्त व्हावा ही इच्छा परिसरातील गावकर्‍यांनी व वाहनधारकांनी बोलून दाखवली.

Post a Comment

0 Comments