Latest News

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र विद्यालय निटूर येथे यशवंताचा सत्कार

महाराष्ट्र विद्यालय निटूर येथे यशवंताचा सत्कार


निटुर:( प्रतिनिधी/रमेश लांबोटे ) आज महाराष्ट्र विद्यालय निटूर येथे नीट परीक्षेत यश प्राप्त केल्याबद्दल शेख यास्मिन बिलाल या विद्यार्थिनीचा महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजयकुमार पाटील निलंगेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यालयात शिक्षण घेऊन आज मेडिकल कॉलेज औरंगाबाद येथे फिजिओ थेरपी करणाऱ्या जमादार वैष्णवी राजकुमार व संतोषी राजकुमार जमादार बाई साहेब सावंत महाविद्यालय सावंत वाडी जिल्हा रत्नागिरी या भगिनींचा हि यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र शिक्षण समितीचे समन्वयक दिलीप धुमाळ, पालक बिलाल शेख, राजकुमार जमादार, पत्रकार राजाभाऊ सोनी, पत्रकार रमेश लांबोटे, राजाभाऊ तापडिया, दिनकर नाना निटुरे, सूर्यकांत निटुरे, नंदकुमार हासबे, प्राचार्य अनिल पाटील दिलीप हुलसुरे, सुभाष पाटील, सुशांत घाटके, लक्ष्मण मगर, रमेश शिंदे, नामदेव तेलंगे, रवी पिंड, अशोक बापू निटुरे, युसुफ शेख, हसन मोमीन, बाशीद गस्ते, लतीफ चाऊस, सूधीर लखनगावे मुख्याध्यापक सुरेंद्र धुमाळ सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments