लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नूतन संचालक जयेश विश्वंभर रावजी माने यांचा सत्कार
शिरूर अनतपाळ: लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नूतन संचालक जयेश विश्वंभर रावजी माने यांचा सत्कार. शिरूर अनंतपाळ तालुक्यातील लक्कड जवळगा येथील जयेश विश्वभरराव माने यांची लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. कैलासवासी ऍडव्होकेट विश्वभरराव माने साहेब यांचे ते सुपुत्र असून गेल्या पंचवीस वर्षापासून विश्वभरराव माने यांनी लातूर जिल्हा बँकेचे संचालक पद भूषविले होते त्यांच्या पश्चात त्याच मतदारसंघातून दिलीपराव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची संचालक पदी बिनविरोध निवड करण्यात आली त्यांच्या या निवडीबद्दल सत्कार करताना प्रा. डॉ. प्रशांत पाटील, प्रा. किशोर कुरे, शिवनेरी महाविद्यालया चे अध्यक्ष प्रताप भैया माने, उपाध्यक्ष सुतेज माने यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला.
0 Comments