कुर्डूवाडी पोलीस ठाणे अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखला
सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत बोधे यांनी घाटणे येथील बालविवाह रोखुन पालकांना दिला समज
कुर्डूवाडी: दि.१२ - घाटणे गावामध्ये बालविवाह होत असल्याची माहिती मिळाली असता पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी कन्हेरगाव नाका हिंगोली येथील एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखला व पुढील कार्यवाहीसाठी बाल न्यायालयात सोपवला. याबाबत सविस्तर माहिती अशी की घाटणे येथील मुलीचा विवाह वारला तालुका वाशिम येथील मुला सोबत होणार असल्याची माहिती मिळाली नमूद अल्पवयीन मुलीचा विवाह होऊ नये यासाठी पोलीस कर्मचारी यांनी अल्पवयीन मुलीचे आई-वडील यांना पोलिस ठाण्यात घेऊन आले व त्यांना समज दिली. व अध्यक्ष बाल न्याय मंडळ सोलापूर यांच्याकडे हजर केले. कुर्डूवाडी पो. ठा. सोलापूर ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत बोधे व त्यांच्या टीमच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखला गेल्याने बोधे व त्याच्या टीमचे कौतुक होत होते.
0 Comments