केळगाव-निटूर महामार्गावर अपघात; पाच ते सहा जण गंभीर जखमी
निलंगा:( प्रतिनिधी/रमेश लांबोटे )तालुक्यातील केळगाव ते बुजरुकवाडी दरम्यान आज रविवारी 1:00 वाजता आयशर टेम्पो क्रुझर जीप समोरासमोर जोराची धडक होऊन भीषण अपघात होऊन त्यामध्ये आठ ते दहा जण गंभीर जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय निलंगा येथे हलवण्यात आले आहे. सविस्तर वृत्त असे लातूर ते जहीराबाद महामार्गावर केळगाव ते बुजरुकवाडी पाटीच्या दरम्यान निटूर जायच्या दिशेने आज रविवारी 1 वाजता आयशियार टेम्पो व क्रुजर जीप चा समोरासमोर आपघत होऊन सहा ते सात जण जखमी झाले. टेम्पो क्रमांक HM 14 AH 6223 हा लातूरचा सोयाबीनची गुळी घेऊन जाणारा टेम्पो लातूर केळगावच्या देशेने जात होता तर नारांगवडी ता. उमरगा वरून भरधाव वेगात लग्नाला निघालेली कृजर क्रमांक MH 14 CC 8338 विरुद्ध दिशेने जाऊन धडक दिल्याने क्रूजर जीपचा चुराडा झाला यात पाच ते सहा जन गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन 108 या रुग्णवाहिकेला संपर्क करून संपूर्ण जखमीला निलंगा येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. निटुर पोलिस चौकीचे बीट अंमलदार सत्यवान कांबळे व पो. कॉ. हरी कांबळवाड यांनी पंचनामा करून दोन्ही वाहनांना महामार्गाच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. मागील काही दिवसांपासून लातूर ते जहीराबाद महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले असून या महामार्गावर अनेक ठिकाणी दिशादर्शक फलक व अनेक गावावर रस्ता दुभाजक नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी संबंधित महामार्ग प्रशासनाने लवकरात गाव तिथे रस्ता दुभाजक करावे अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांतून होत आहे.
0 Comments