Latest News

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र विद्यालय निटूरची विद्यार्थीनी यास्मिन शेख NEET परीक्षेत 651 गुण घेऊन उज्वल यश

 महाराष्ट्र विद्यालय निटूरची विद्यार्थीनी यास्मिन शेख NEET परीक्षेत 651 गुण घेऊन उज्वल यश



रमेश लांबोटे

निटूर:  येथील महाराष्ट्र विद्यालय निटूर ची विद्यार्थीनी यास्मिन बिलाल शेख ही हुशार व होतकरू विद्यार्थिनी, महाराष्ट्र विद्यालय निटुर या शाळेतून एस,एस,सी परीक्षेमध्ये 97,40% गुण घेऊन आपला होतकरू पणा दाखवला होता, त्यात आणखी आजच्या NEET परीक्षेत 651 गुण घेऊन खऱ्या अर्थाने ,विद्यार्थि कष्ट करून आपल्या कर्तृत्वावर, आपल्या गुणावर, तिचे ,तिच्या आईवडिलांचे निटूर गावचे व परिसराचे नाव लोकिक केले आहे, ग्रामीण भागातील मराठी माध्यमाच्या शाळेतून विद्यार्थी, ही परीक्षा चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होऊ शकते हे ही सिद्ध केली आहे. ग्रामीण भागात भागातील विद्यार्थी ही परीक्षा चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होऊन यशस्वी होऊ शकते हा एक आदर्शच यास्मिन च्या रूपाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आहे. या यशाबद्दल "मराठी अस्मितेचा इशार" वृत्तपत्राचे संपादक के.वाय. पटवेकर, महाराष्ट्र विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेंद्र धुमाळ, पत्रकार रमेश लाबोटे, व नातलग, मित्रपरिवार तुन यास्मिन शेख यांचे अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments